वृत्तसंस्था :- इंडोनेशियातील सुमात्रामध्ये मुखलिस बिन महंमद नावाच्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी २८ वेळा चाबकाचे फटके मारण्यात आले. विवाहित महिलेशी संबंध असल्याचा मुखलिसवर आरोप आहे. इंडोनेशियात याला व्यभिचार मानले जाते.
ज्या महिलेसोबत मुखलिसला पकडण्यात आले तिलाही २३ फटके मारण्यात आले. विशेष म्हणजे ज्या एकेह उलेमा काैन्सिलने हे कडक नियम बनवले आहेत त्याच्याशी मुखलिसचा संबंध आहे. मुखलिसनेच व्यभिचार करणाऱ्यांविरोधात कडक कायदे करण्यात पुढाकार घेतला होता.
ह्या लोकांची अशी धारणा आहे कि, हे अल्लाने बनवलेले नियम आहेत. जो हे नियम तोडेल त्याला शिक्षा मिळेल. मग तो उलेमा कौन्सिलचा सदस्य असला तरी.

या जोडप्याला सुमात्रा समुद्रकिनाऱ्यावर एका कारमध्ये पोलिसांनी पकडल्याचे सांगण्यात येते. गुरुवारी शिक्षा देण्यात आली. मुखलिसला कौन्सिलमधून हटवण्यात आले आहे.
मुखलिस धर्मगुरूदेखील आहे. तो पहिलाच धर्मगुरू आहे, ज्याला देशात २००५ मध्ये शरिया कायदा लागू झाल्यानंतर सार्वजनिकरीत्या फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली.
- महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या ‘या’ महामार्गाचे चौपदरीकरण ! महाराष्ट्रातील १५३ गावांमधून जाणार मार्ग
- बातमी कामाची ! ५० पैशांचे नाणे अजूनही चालू शकते का ? RBI ने स्पष्टच सांगितलं
- ‘या’ 200 झाडांच्या लागवडीतून शेतकरी झाला करोडपती ! 65 हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळाला 10 कोटी रुपयांचा नफा
- पिवळ सोन पुन्हा चमकल ; ‘या’ मार्केटमध्ये सोयाबीनला मिळाला 6,250 रुपयांचा भाव
- 801 किमी नाही, आता 840 किलोमीटर…..; 11 ऐवजी ‘या’ 13 जिल्ह्यांमधून जाणार नवा शक्तीपीठ महामार्ग !













