अहमदनगर : शहरातील घासगल्ली भागात दोन गटात हाणामारी झाल्याची घटना दि. ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वा.सुमारास घडली. याबाबत कोतवाली पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोतवाली पोलिस ठाण्याचे पो. कॉ. शहीद सलीम शेख गस्तीवर असताना त्यांना अनस मोहम्मद लुकमान खत्री (वय १९), मोहम्मद अबीद हारून खत्री (वय २१, दोघे रा. गोविंदपुरा), आकाश अरुण पंचमुख (वय २१), सुरज रमेश पंचमुख (वय १९, दोघे रा. साईराम सोसायटी, कल्याण रोड) व प्रशांत बलभीम गावडे (वय १९, रा. भावनाऋषी सोसायटी) हे आपसात हाणामारी करताना आढळून आले.
पो.कॉ.शहीद शेख यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.

- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ई-केवायसीतील त्रुटींमुळे लाभ थांबलेल्या महिलांसाठी १८१ हेल्पलाइन जाहीर
- अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीलाच का? 2026 च्या बजेटकडून करदाते आणि गुंतवणूकदारांच्या मोठ्या अपेक्षा
- राज्यात ढगाळ हवामानामुळे थंडीचा जोर कमी, उष्णतेत वाढ; पुढील दोन दिवसांत बदलाची शक्यता
- अनुदानित व विना-अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना टप्पा अनुदान मंजूर; GR जारी
- फेब्रुवारी २०२६ मध्ये मिळणाऱ्या जानेवारी महिन्याच्या वेतनाबाबत आनंदाची बातमी; शासन निर्णय (GR) जाहीर!













