अहमदनगर :- गुरुवारी रात्री नगर – सोलापूर रस्त्यावर नगर तालुक्यातील साकत गावाजवळ मालट्रक व क्रुझर गाडीचा अपघात होऊन क्रुझरमधील नऊ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातानंतर मालट्रकचालक वाहनासह पळून गेला आहे.
क्रुझर जीपचालक नागेस गणपत आदलिंगे, श्रीधर शिवाजी माळी, कोमल श्रीधर माळी, महादेव हरिश्चंद्र माळी, अजित जनार्दन क्षीरसागर, तृप्ती अजित क्षीरसागर, कान्होपात्रा सुदर्शन यादव, सुदर्शन महावीर यादव, गोपाळ भरत हंडे, एकनाथ हरिश्चंद्र माळी अशी जखमींची नावे असून,
सर्व जण सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथील रहिवासी आहेत.
दोन जणांच्या पाय व हाताला गंभीर दुखापत झाली असून, इतर किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती नगर तालुका पोलिस स्टेशनकडून मिळाली.
अपघातानंतर मालट्रकचालक वाहनासह निघून गेला. त्यानंतर जखमींना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
नगर-सोलापूर महामार्गावर पावसामुळे मोठ-मोठ खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे खड्डे हुकविण्याच्या प्रयत्नात या मार्गावर अपघात होत आहे.या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध नगर तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! 2, 5, 6 आणि 7 डिसेंबरला महाराष्ट्रातील सर्व शाळा बंद राहणार, कारण काय?
- सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! एलपीजी गॅस सिलेंडर झाला स्वस्त, किती कमी झालेत दर ? वाचा……
- भारतातील सर्वात उंच स्थानक 2027 मध्ये सेवेत ! ‘या’ शहरात विकसित करणार 16 मजली उंच रेल्वे स्टेशन ! लंडन, पॅरिसला देणार टक्कर
- महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी !
- सरकारचा निर्णय शेतकऱ्यांसाठी बनलाय डोकेदुखी ! शेतजमीन खरेदी-विक्रीचा नियम पूर्णपणे बदलला, ‘या’ कागदाविना आता जमीन विक्री होणे अशक्य













