हैदराबाद : येथील एका रिक्षाचालकाने पत्नी कुरूप दिसत असल्याचा आरोप करत तलाक दिल्याची घटना गुरुवारी उघड झाली. या प्रकरणी पीडित पत्नीच्या तक्रारीनंतर रिक्षाचालकावर मुस्लिम महिला संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मोहम्मद मुस्तफा हा कापड व्यावसायिक असल्याचे तिच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. यानंतर गत जुलै महिन्यात पीडित महिला व रिक्षाचालक मुस्तफाचा विवाह झाला.

मात्र, लग्न झाल्यानंतर मुस्तफा एक रिक्षाचालक असून, त्याच्याकडे स्वत:च्या मालकीचे घरही नसल्याचे पीडित मुलगी व तिच्या पालकांच्या निदर्शनास आले. या दरम्यान माहेरहून पैसे आणण्यासाठी मुस्तफाने पत्नीचा छळ सुरू केला.
तिला कुरूप म्हणत मुस्तफा वारंवार तिचा अवमान करू लागला. दरम्यानच्या काळात सासू-सासऱ्यांनीदेखील पीडित महिलेचा छळ केला. अनेक वेळा तिला घरात डांबून ठेवण्यात आले. माहेरच्या लोकांसोबत बोलण्यावरही सासरच्या मंडळींनी निर्बंध घातले.
वारंवार होणाऱ्या छळाला कंटाळून पीडित महिला माहेरी आली. मात्र, गेल्या महिन्यात मुस्तफाने माझ्या आई-वडिलांच्या घरी आपल्याला शिवीगाळ करत तलाक दिल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
- राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, 3 अपत्य असतानाही मिळणारा ‘हा’ लाभ
- राज्यातील लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वी मिळणार मोठी भेट ! नोव्हेंबर , डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर
- सोन्याच्या किमतीत अजूनही तेजीचे संकेत ! दहा ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी दोन लाख रुपये मोजावे लागणार ? काय सांगतात तज्ञ
- ‘हा’ आहे शेअर मार्केटचा धुरंदर स्टॉक ! 5 वर्षात दिलेत 19000 टक्के रिटर्न, दोन रुपयांच्या स्टॉकने बनवलं श्रीमंत
- महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार नव्या रेल्वे स्टेशनची भेट ! कोणत्या रेल्वे मार्गावर तयार होणार नव स्थानक ?