मुंबई : सरकार स्थापन करण्यास जर भाजपा अपयशी ठरली तर राज्यातील जनतेच्या हितासाठी सरकार स्थापन करण्याची जबाबदारी शिवसेना स्वीकारेल, असा गौप्यस्फोट शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनी केला आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा लोकशाही मानणाऱ्यांच्या तोंडी शोभत नाही. राष्ट्रपती कोणाच्या खिशात नसतात, असेही त्यांनी भाजपाला सुनावले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ईडी, इन्कम टॅक्स, राष्ट्रपती राजवट अशा धमक्या दिल्या जात आहेत. पण आता कोणत्याही पक्षातील आमदार फुटणार नाही. सरकारी यंत्रणांचा वापर करून यांनी फोडाफोडीचे राजकारण केल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला.
अशाच राजकारणामुळे राज्यातील जनतेने बंड केले. राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या जागा मिळाल्या हे त्याचेच फलित आहे. शरद पवारांच्या बाबतीत ईडीचे प्रकरण घडायला नको होते, असेही ते म्हणाले. हीच ती वेळ असल्याचे सांगताना मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
- विधवा महिलेच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती सासरच्या लोकांना मिळणार की माहेरच्या ? सुप्रीम कोर्टाचा थक्क करणारा निर्णय काय?
- मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ शहरासाठी चालवली जाणार नवीन एक्सप्रेस ट्रेन; कसा असणार रूट, वेळापत्रक?
- महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! शिक्षण विभागाच्या नवीन सूचना
- शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; डिसेंबर महिन्यातील ‘या’ तारखेला अतिरिक्त सुट्टी जाहीर, GR जारी…
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांची मोठी घोषणा ! सुरु होणार नवीन ट्रेन, कसा असणार रूट? वाचा…













