नवी दिल्ली : देशात पाच कोटींपेक्षा अधिक नवीन सदस्य जोडण्याची उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी काँग्रेसने एक विशेष ॲप तयार केले आहे. याअंतर्गत आपल्या नवीन सदस्याची विस्तृत माहिती संकलित के ली जाणार आहे. ही माहिती नवीन सदस्याचा वर्ग आणि व्यवसायाच्या आधारे तयार केली जाणार आहे.
काँग्रेस सदस्यता अभियानाशी निगडित सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षाकडून तयार करण्यात आलेल्या या ॲपचे नाव ‘ऑफिशियल आयएनसी मेंबरशिप’ असे ठेवण्यात आले आहे. या ॲपला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची मंजुरी मिळाली असून याची सुरुवात सोमवार ४, नोव्हेंबरपासून होत आहे.

काँग्रेस भाजपाप्रमाणे मिस्ड कॉलच्या माध्यमातून नव्हे, तर या ॲपच्या माध्यमातून वास्तविक सभासद बनवण्यास सुरुवात करत आहे. सुरुवातीच्या काळात छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि गोवा या राज्यांत सदस्यता अभियानाची सुरुवात केली जात आहे.
यानंतर देशाच्या दुसऱ्या राज्यातही या ॲपला सुरुवात केली जाणार आहे. या ॲपच्या माध्यमातून काँग्रेसची सदस्यता घेणाऱ्या व्यक्तीचा प्रथम मोबाईल नंबर ॲपमध्ये टाकला जाईल आणि नंतर त्याचा फोटो घेतला जाईल. यानंतर कॅटेगिरी, व्यवसायाचे कॉलम भरले जातील.
यानंतर त्याचा सदस्यत्वाचा फॉर्म सबमिट केला जाईल. या ॲपमध्ये जनरल, ओबीसी,एससी, एसटी,अल्पसंख्याक आणि इतर असे कॉलम असणार आहेत. ॲपच्या माध्यमातून एक विस्तृत डेटाबेस तयार करत आहे.
- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ‘या’ 12 योजनेच्या माध्यमातून मिळणार 60 ते 90 टक्के अनुदान ! अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 22 कोटींचा निधी मंजूर
- शेअर मार्केट गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी ! ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना पहिल्यांदाच लाभांश देणार
- महाराष्ट्रातील ‘या’ 44 गावांमधून जाणार नवा रेल्वे मार्ग…! 131 किमी लांबीच्या Railway प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी
- सोन्याची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार ! 1 तोळा सोने घेण्यासाठी 7,50,000 रुपये मोजावे लागणार?
- 6 डिसेंबर 2025 पासून महाराष्ट्रातील 600 सरकारी शाळा बंद होणार ? फडणवीस सरकारचा मोठा निर्णय













