मुंबई: अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

‘महा’ चक्रीवादळादरम्यान समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग जास्त असणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तसेच समुद्रात गेलेल्या मच्छिमारांनी पुन्हा किनाऱ्यावर येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व परिस्थिची सामना करण्यासाठी सर्व यंत्रणांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
पावसाळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचं सावट निर्माण झालेल्या मराठवाडा, विदर्भात आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळं पिकांचे नुकसान झाल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
- देशातील ‘या’ बँका देणार सर्वात स्वस्त Home Loan ! 50 लाखांच्या कर्जासाठी कितीचा हप्ता ?
- पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत 12 हजार 500 रुपयांची गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना मिळणार 40 लाखांचे रिटर्न!
- महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 26 ऑक्टोबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर ?
- चेकवर सही करण्यासाठी ‘या’ रंगाचा पेन वापरला तर तुमचा चेक वठणार नाही !
- मोठी बातमी ! 2025 अखेर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार Vande Bharat Express ! 550 किमीचा प्रवास आता फक्त 7 तासात