अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत पारनेर मतदारसंघासह नगर शहर आणि श्रीरामपूर मतदारसंघात शिवसेनेचा दारूण पराभव झाला. जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार विजयी झाला नसून, त्याला जिल्हाप्रमुख जबाबदार आहेत. पारनेर, नगर शहर व श्रीरामपूर मतदारसंघातील तालुक्यात कार्यरत असलेल्या जिल्हाप्रमुखांची तत्काळ हकालपट्टी करावी, असा सूर पारनेर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत आळवण्यात आला.
विधानसभा निवडणूकीत पारनेर – नगर मतदारसंघातून विजय औटी, नगर शहर मतदारसंघातून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, श्रीरामपूरमधून भाऊसाहेब कांबळे या तीन शिवसेनेचे उमेदवारांनी निवडणूक लढविली. नगर शहर आणि पारनेर मतदारसंघात शिवसेनेचे चांगले वातावरण होते. तर श्रीरामपूरमध्ये काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणारे कांबळे
यांच्यासाठी शिवसेना पक्ष नवीन होता.

शिवसेना आणि भाजपची युती असताना नगर शहर, पारनेर, श्रीरामपूर या तिन्ही मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. नगर जिल्ह्यात शिवसेनेचे चार जिल्हा प्रमुख आहेत. नगर दक्षिणेत दोन तर उत्तरेत दोन असे चार जिल्हा प्रमुख काम करतात.
दक्षिणेत प्रा. शशिकांत गाडे यांच्याकडे पारनेर, नगर आणिश्रीगोंदा तालुका, राजेंद्र दळवी यांच्याकडे कर्जत, जामखेड, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्याची जबाबदारी आहेत. तसेच उत्तरेत रावसाहेब खेवरे यांच्याकडे अकोले, संगमनेर, राहाता तर राजेंद्र झावरे यांच्याकडे नेवासा, कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यांची जबाबदारी आहे.
जिल्ह्यातील बारा मतदार संघात चार जिल्हा प्रमुख काम करत होते. चार जिल्हा प्रमुखांकडे तिन तालुक्याचीजबाबदारी असताना गाडे यांनी उमेदवारांचे काम प्रामाणिकपणे केले नाही. दक्षिणेत दोन तर उत्तरेत दोन असे शिवसेनेचे जिल्ह्यात चार जिल्हा प्रमुख असताना शिवसेनेचे तिनही उमेदवारांचा पराभव झाला,
गाडे यांच्याकडे पारनेर व नगर शहराची जबाबदारी असताना त्यांनी औटी व राठोड यांचे काम केले नाही तसेच श्रीरामपूरमध्ये झावरे व खेवरे सेनेच्या उमेदवारांना विजयी करण्यात अपयशी ठरले असल्याने त्यांची हकालपट्टी करावी तसेच नव्याने जिल्हा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचा निर्णय पारनेर येथे झालेल्या शिवसैनिकांच्या बैठकीत घेण्यात आला.
- Apollo Tyres Share Price: अपोलो टायर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? सध्याची ट्रेडिंग पोझिशन काय? रेटिंग अपडेट
- ONGC Share Price: तज्ञ म्हणतात ONGC चा शेअर खरेदी करा! मात्र 1 वर्षात झाली 20.28% घसरण…बघा आजची किंमत
- CDSL Share Price: मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आज मोठ्या कमाईची संधी! नोट करा तज्ञांची टार्गेट प्राईस
- Vedanta Share Price: वेदांता शेअर आज बुलीश…मोठ्या प्रमाणावर खरेदी! तज्ञ म्हणतात की…
- IFCI Share Price: IFCI शेअर्समध्ये मागच्या आठवड्यापासून तेजी! दिला 5.82% रिटर्न… आज मात्र?