श्रीरामपूर: नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोरच मोड फुटलेल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्यास शेतकऱ्याने आग लावली. ही घटना बेलापूर खूर्द येथे घडली.
महाडीक यांच्या शेतातील सोयाबीनला मोड फुटल्याने ग्रामसेवक सी. डी. तुंबारे, कृषी अधिकारी तनपुरे, कोतवाल सुनील बाराहते हे पंचनामा करण्याकरता गेले होते.

पंचनामा, फोटो, सातबारा, विमा पावती आदींची पूर्तता केल्यानंतर शासन मदत तरी किती देणार यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमक्षच सोयाबीनच्या गंजीस आग लावली.
- शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा, आता शेतकऱ्यांना…
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 18 वर्षे नोकरी केल्यानंतर आता ‘हे’ काम करावेच लागणार, नाहीतर…..
- सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळतात ‘हे’ तीन मोठे आर्थिक लाभ ! वाचा डिटेल्स
- राज्यातील लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचे गिफ्ट मिळणार! 2026 सुरू होण्याआधीच खात्यात जमा होणार इतके पैसे
- नाशिक-अहिल्यानगर-पुणे रेल्वेमार्ग बदलल्याने कोणते तोटे सहन करावे लागतील ? वाचा…













