अहमदनगर :- विविध संशोधनांमुळे तंत्रज्ञानात मोठे बदल घडत आहेत. विज्ञानातील विविध पैलूंची सखोल माहिती तरुण पिढीला होणे आवश्यक आहे. तरुणांना वैज्ञानिक क्षेत्रात गरुडभरारी घेता यावी,
यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील चर्चासत्र आयोजित करणार असून नगरमधून जास्तीत जास्त तरुण इस्त्रोमध्ये कसे जाऊ शकतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले.

सावेडीतील प्रमोद महाजन स्पर्धा परीक्षा केंद्रात चाणक्य मंडळ आयोजित सकल ब्राह्मण समाजातर्फे इस्त्रोतील वरिष्ठ शास्त्रज्ञ आदित्य वैद्य यांचा अनुभव कथनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जगताप बोलत होते.
प्रा. माणिकराव विधाते, रत्नाकर कुलकर्णी, श्रीकृष्ण जोशी यावेळी उपस्थित होते. चांद्रयान मोहीम, त्यातील बारकावे, तसेच इस्त्रो व नासाचे कामकाज याबाबत प्रेक्षकांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शास्त्रज्ञांशी चर्चा केली.
विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टिकोनातून वैद्य यांच्याकडून वैयक्तिक मार्गदर्शन घेतले. जगताप यांनी आदित्य यांचा सत्कार करून विद्यार्थी व तरुणांना अशा प्रकारची संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.
नगरमधून विद्यार्थी वर्गास इस्त्रो येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला. शास्त्रज्ञ आदित्य वैद्य यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. चांद्रयान मोहिमेचे अनुभव त्यांनी कथन केले. शास्त्रज्ञ होण्यासाठी वेगवेगळ्या शैक्षणिक संधींबद्दल त्यांनी मार्गदर्शन केले.
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! सुरू झाल्यात दोन नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ Railway Station वर थांबा मंजूर
- लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून जमा होणार पैसे ; ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता सोबत जमा होणार का ?
- ब्रेकिंग : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निघालेत 3 महत्वाचे शासन निर्णय ( GR ), कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार?
- 25 हजार रुपयांची गुंतवणूक आणि 18 लाख रुपयांचे रिटर्न ! पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना ठरणार फायदेशीर
- ‘ही’ सिमेंट कंपनी शेअरहोल्डर्सला देणार 80 रुपयांचा लाभांश! शेअर मार्केट गुंतवणूकदारांना कमाईची नवीन संधी













