लासलगाव : परतीचा पावसाने उघडीप दिल्याने लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समितीत नवीन लाल कांद्याची आवक होत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढल्याने मागणी घटली.
परिणामी लासलगाव बाजार समितीत सोमवारच्या (दि.४) तुलनेत मंगळवारी आणि बुधवारी टप्प्याटप्प्याने दोन दिवसांत प्रति क्विंटलमागे १ हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे कांद्याचे बाजारभाव ५ हजार रुपयांच्या आत आले. कांदा बाजारभावात अशीच घसरण सुरू राहिल्यास उत्पादकांना नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

उन्हाळ कांद्याच्या या हंगामात सोमवारी (दि.४) कांद्याला प्रतिक्विंटल ५७५७ रुपये उच्चांकी दर मिळाला होता. बुधवारी (दि.६) सकाळच्या सत्रात उन्हाळ कांद्याची २५५ वाहनांतून २९३४ क्विंटल आवक झाली होती.
त्याला जास्तीत जास्त ४८००, सरासरी ४४५१, तर कमीत कमी २००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. परतीच्या पावसाने गेल्या चार दिवसांपासून उघडीप दिल्याने लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याची १३ वाहनांतून १४६ क्विंटल आवक झाली होती. त्याला जास्तीत जास्त ३६०१, सरासरी ३००० रुपये, तर कमीत कमी ११०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला
- कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोक कोणासमोरचं झुकत नाहीत ! या लोकांचा स्वभाव कसा असतो ?
- घरकुल योजनेत ऐतिहासिक बदल ! आता जागा खरेदी करण्यासाठी सुद्धा मिळणार ‘इतके’ अनुदान
- दूध देणाऱ्या गाई – म्हशी खरेदी करण्यासाठी मिळणार 50 टक्के अनुदान ! अर्ज कुठं करणार?
- 1000 किलोमीटरचा प्रवास आता फक्त आठ तासात! वंदे भारत स्लीपर ट्रेन बाबत लोकसभेतून समोर आली मोठी अपडेट
- राज्यातील शेतकऱ्यांना खुशखबर ! कर्जमाफीसाठीची प्रक्रिया झाली सुरु, फडणवीस सरकारकडून राज्यातील बँकांना महत्त्वाचे आदेश













