मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. 13 व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यामुळे तांत्रिक बाबींच्या पूर्ततेसाठी फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा सोपवला.

यावेळी भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, राम कदम, रावसाहेब दानवे, आशिष शेलार, संजय कुटे, प्रसाद लाड यासारखे नेते उपस्थित होते.
राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्ता संघर्षाचा तिढा अद्यापही कायम आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन १४ दिवस उलटले असतानाही राज्यात नव सरकार स्थापन झालेलं नाहीये.
निवडणुकीत शिवसेना-भाजप यांच्या महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. भाजपने १०५ जागांवर विजय मिळवला आहे तर शिवसेनेने ५६ जागां जिंकल्या आहेत. त्यामुळे सत्तेच्या चाव्या या शिवसेनेकडे गेल्या आहेत.
- आता फक्त 35 हजारात मिळणार नवा कोरा ट्रॅक्टर ! सरकार करणार मदत
- पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे – जळगाव नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार, कसा असणार रूट?
- महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय ! आता ‘या’ लोकांचे जन्म – मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले जाणार, कारण काय ?
- महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी फडणवीस सरकारचा नवा जीआर ! आता ‘हे’ एक काम केल्याशिवाय 1500 रुपये मिळणार नाही
- पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! परीक्षा शुल्कात झाली मोठी वाढ