राहुरी: म्हैसगाव , शेरी चिखलठाण येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार प्राजक्त तनपुरे यांनी पाहणी केली. यावेळी ‘ पिकांच्या नुकसानीसह, वाहून गेलेल्या शेतीचे स्वतंत्र पंचनामे करावेत’ , अशी सूचना त्यांनी तहसीलदारांना केली.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना मोबाईलवर संपर्क साधून , नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन निधीतून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी . रस्त्यांच्या कामासाठीही निधी देण्याची मागणी त्यांनी केली.

ओढे – नाल्यांतील पाण्यातून वाट काढत , उंच – सखल जमिनीवरील चिखल तुडवत , दोन किलोमीटर पायी चालून तनपुरे यांनी फुटलेले बंधारे पाहिले . वाहून गेलेली शेती व ऊसपिके , मुळासकट उपटलेल्या डाळिंबबागा खराब झालेले रस्ते , असे विदारक चित्र पाहून तनपुरे हळहळले.
रस्ते व बंधाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले .
जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेल्या ड्रोनच्या साह्याने कुरणदरा ओढ्याच्या दुतर्फा शेतजमिनींच्या नुकसानीचे चित्रीकरण करण्यात आले .
दरम्यान, पिकांच्या नुकसानीसाठी जिरायती क्षेत्राला रुपये ६८०० , तर बागायत क्षेत्राला १८ हजार रुपये हेक्टरी मदत दिली जाईल . वाहून गेलेल्या शेतजमिनीसाठी ३७ हजार ५०० व मातीचा भर जमा झालेल्या शेतजमिनीसाठी १३ हजार ५०० रुपये मदत दिली जाईल, असे तहसीलदार शेख यांनी सांगितले.
- आज पासून फोनपे, गुगलपेच्या नियमात झाला मोठा बदल ! आता ग्राहकांना एका दिवसात….
- Apollo Tyres Share Price: अपोलो टायर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? सध्याची ट्रेडिंग पोझिशन काय? रेटिंग अपडेट
- ONGC Share Price: तज्ञ म्हणतात ONGC चा शेअर खरेदी करा! मात्र 1 वर्षात झाली 20.28% घसरण…बघा आजची किंमत
- CDSL Share Price: मल्टीबॅगर स्टॉकमध्ये आज मोठ्या कमाईची संधी! नोट करा तज्ञांची टार्गेट प्राईस
- Vedanta Share Price: वेदांता शेअर आज बुलीश…मोठ्या प्रमाणावर खरेदी! तज्ञ म्हणतात की…