आ. लंकेच्या पाठपुराव्यामुळे रस्ते दुरुस्तीसाठी ५ कोटींचा निधी मंजूर

पारनेर –

नगर मतदारसंघातील रस्त्यांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ४ कोटी ७७ लाख ८५ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याच्या निविदाही प्रसिद्ध झाल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.

मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे निवडणुकीपूर्वी काही महिने आगोदर या रस्त्यांच्या दुरुस्तीसंदर्भात आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता.

 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण मतदारसंघात काढलेल्या जनसंवाद यात्रेदरम्यानही नागरिकांनी रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आपणाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळीही आपण बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून रस्ते दुरुस्तीसंदर्भात पाठपुरावा केला होता. 

मध्यंतरी आचारसंहितेच्या काळात या कामांना प्रारंभ होऊ शकला नाही. आचारसंहिता संपल्यानंतर आपण पुन्हा या कामासाठी संबंधितांकडे पाठपुरावा केल्यानंतर विविध रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध झाल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.

बेल्हे, अळकुटी, निघोज रस्त्यासाठी ७३ लाख २४ हजार, राहाता, लोहारे, पारनेर, वाडेगव्हाण रस्त्यासाठी १ कोटी १६ लाख ८६ हजार, भाळवणी, गोरेगाव, किन्ही, कान्हूर, वडगावदर्या, दरोडी, म्हस्केवाडी, चोंभूत रस्त्यासाठी ५२ लाख ८७ हजार, वडझिरे, पारनेर, सुपा, वाळकी, कौडगाव रस्त्यासाठी ४१ लाख ८५ हजार, राज्य मार्ग २२३ ते वासुंदे, वनकुटे रस्ता ३२ लाख २७ हजार, पारनेर, बाबुर्डी, विसापूर, पिंपळगावपिसा, एरंडोली, वाळकी, घोसपुरी, घोडकेवाडी, रांजणगाव मशीद रस्ता ३५ लाख ३२ हजार,

पारनेर, जामगाव, भाळवणी रस्ता १५ लाख ४३ हजार, मांडवे, देसवडे, पोखरी, पिंपळगावरोठा, अक्कलवाडी रस्ता ३६ लाख ७९ हजार, राज्य मार्ग ५० ते बोटा अकलापूर ते पोखरी, कामटवाडी, पळशी, वनकुटे रस्ता ३८ लाख २१ हजार, कान्हूर, वेसदरे, वडझिरे, चिंचोली, सांगवीसूर्या, जवळा रस्ता १५ लाख ७८ हजार, वाडेगव्हाण, पाडळी, कळमकरवाडी, कडूस, बाबुर्डी, रस्ता २० लाख २३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे आमदार लंके यांनी सांगितले.