संगमनेर : संगमनेर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकली चोरी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून मंगळवारी पुन्हा चिखली शिवारातील लक्ष्मी माता मंदिरापासून वीस हजार रुपये किंमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन पोबारा केला आहे.
यामुळे मोटारसायकल चोरांनाही संगमनेर शहराचा लळा लागला की काय, असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. त्यामुळे मोटारसायकल स्वारांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. तर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक अभय परमार हे कधी या मोटारसायकल चोऱ्यांच्या मुसक्या आवळणार,असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.

गेल्या एक ते दोन महिन्यांपासून संगमनेर शहरातील ठिकठिकाणच्या भागातून व हॉस्पीटल समोरुन अज्ञात चोरट्यांनी मोटारसायकली चोरुन पोबारा केला आहे. पण अद्यापही शहर पोलिसांना या मोटारसायकल चोरट्यांचा शोध लावता आला नाही.
त्यामुळे मोटारसायकलस्वार अक्षरश: चोरट्यांना वैतागले आहेत. जवळपास एका एका मोटारसायकलची किंमत दहा ते वीस हजार रुपये ऐवढी आहे. गुन्हा दाखल करण्यापलीकडे पोलिस काहीच करत नाही. हे चोरटे बरोबर पाळत ठेवून मोटारसायकली चोरुन पोबारा करत आहेत. आत्तापर्यंत अनेक मोटारसायकली चोरी गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
- शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारची मोठी भेट! राज्य मंत्रिमंडळाने घेतलेत ८ मोठे निर्णय
- साडेतीन शक्तीपीठांच्या दर्शनासाठी एसटी महामंडळाची नवी योजना ! 27 सप्टेंबर पासून सुरु होणार विशेष बससेवा, तिकीट किती असेल?
- महाराष्ट्रातील ‘या’ रेल्वे मार्गासाठी आणखी 150 कोटी रुपयांचा निधी मंजूर !
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सुप्रीम कोर्टाची अखेरची डेडलाईन ! ‘या’ तारखेपर्यंत निवडणुका घेण्याचे आदेश
- Reliance Power Share Price: रिलायन्स पॉवर शेअर करणार धमाल! एका दिवसात 3.51% रिटर्न…आज मिळेल प्रॉफिट?