नगर: अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणात आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायधीश ए. एस. खडसे यांनी १२ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. लग्नाचे आमिष दाखवून आरोपी राहुल पंडित मगरे (१६, फकीरवाडी) याने गेल्या तीन वर्षांपासून १६ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार देण्यात आली.
आरोपी हा बकऱ्या चारण्याचे काम करतो. १२ जुलै २०१६ रोजीपासून आरोपी अत्याचार करत होता. दिवाळी निमित्त पीडिता मावशीच्या गावी गेली होती. मात्र मुलीच्या शरीरात बदल दिसल्याने तिने पीडितेला फुलंब्री येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तेव्हा ती सात महिन्यांची गर्भवती असल्याची महिती डॉक्टरांनी दिली.

आरोपीविरोधात हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करून राहुल मगरेला शुक्रवारी सायंकाळी अटक केली. त्याला शनिवारी (दि. ९) जिल्हा व सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांच्यासमोर हजर करण्यात आले.
सहायक लोकअभियोक्ता आर. सी. कुलकर्णी यांनी त्या दोघांची डीएनए चाचणी करावयाची आहे, वैद्यकीय तपासणी करावयाची असल्यामुळे पोलीस कोठडी देण्याची विनंती केली.
- सोलापूरकरांसाठी गुड न्यूज ! जिल्ह्याला मिळणार आणखी एक वंदे भारत ट्रेन, कुर्डूवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर होणार?
- शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! आता 10 वी बोर्ड परीक्षेत ‘या’ विषयाला 25 गुण मिळाले तरी विद्यार्थी पास होणार
- आठवा वेतन आयोग…… ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांचे बेसिक पे 18,000 रुपयांवरून थेट 44,000 रुपयांवर पोहचणार!
- मोठी बातमी ! एका वर्षात पाचपट परतावा देणाऱ्या कंपनीची बोनस शेअर्सची घोषणा, रेकॉर्ड डेट नोट करा
- महाराष्ट्रातील ‘या’ चार जिल्ह्यांमधून जाणार नवा महामार्ग ! 37013 कोटी रुपयांचा निधी मंजूर, कसा असणार रूट?