संतापजनक: संसदेबाहेर बलात्काराचा निषेध करणाऱ्या ‘त्या’ मुलीचा ठाण्यात नेऊन  छळ

नवी दिल्ली: हैदराबादेत सामूहिक बलात्कारानंतर २७ वर्षीय व्हेटरनरी डॉक्टरला जाळल्याच्या निषेधार्थ देशभरात निदर्शने होत आहेत. आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी करत हैदराबाद आणि तेलंगणाच्या अनेक भागात लोक रस्त्यावर उतरले.

दरम्यान, दिल्लीत अनू दुबे नावाच्या मुलीने एकटीने संसद भवनाबाहेर निषेधार्थ धरणे आंदोलन केले. ‘माझ्या भारतात मला सुरक्षित का वाटत नाही?’ असा फलक तिने हातात धरला होता.

पोलिसांनी तिला ताब्यात घेत ठाण्यात नेले. चार तासांनी आंदोलन न करण्याच्या अटीवर तिला सोडून देण्यात आले.

अनूने आरोप केले की, तिला चांगली वागणूक दिली नाही आणि मारहाण झाली. तिला खाली झोपवून तीन महिला हवालदार तिच्या अंगावर बसल्या. नखांनी ओरबाडले आणि मारहाण केली.

अनूच्या हातावर जखमा होत्या. अनूने सांगितले, मला कोणी जाळून मारू नये यासाठी मी हे करते आहे.