शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: उद्या होणार शिवनेरीवर शेतकरी कर्जमाफीची घोषणा?

मुंबई : महाविकास आघाडी चे सरकार आल्या नंतर कर्जमाफी होणार असल्याचे संकेत सर्वच नेत्यांनी दिले आहेत. राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी कर्जमाफीबाबत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याचीच उत्सुकता आहे.

शिवरायांच्या जन्मस्थळावर उद्धव ठाकरे कर्जमाफीची मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किल्ले शिवनेरीवर उद्धव ठाकरे सरसकट शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याचे संकेत आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या एकवीरा देवीचं दर्शन घेऊन शिवनेरी गडावरून शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे शिवनेरीला जाऊन आपला शब्द पूर्ण करण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची रोड मॅप तयार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. संपूर्ण कर्जमाफीसाठी  35 हजार 800 कोटी रुपये लागण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत विविध खात्यांशी संबंधित आढावा घेतला होता. विमा कंपन्यांकडे 15 हजार कोटी थकीत आहेत.

कर्जमाफीसाठी निधी उभारण्याचे अनेक पर्याय सरकारकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आता कर्जमाफीची घोषणा कधी करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे.

अभिनेत्री केतकी माटेगावकर बद्दलच्या ह्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ?