आणि पत्नीने सोडली त्याची साथ

भिवंडी : पतीसोबत दुचाकीवरून नातेवाईकांकडे निघालेल्या दुचाकीला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला . या अपघातात पती जखमी झाला असून ही घटना भिवंडी तालुक्यातील खोणी ग्रामपंचायत क्षेत्रात सावरापाडा येथे गुरुवारी घडली आहे.

ललिता चंद्रशेखर महंतो ( वय 40 वर्ष रा. मिठपाडा ) असे मयत महिलेचे नाव आहे. सदर महिला आपल्या पतीसोबत दुचाकीवरून खाडीपार येथे नातेवाईकांकडे जाण्यासाठी निघाली होती.

रस्त्याच्या कडेला सुरु असलेल्या  खोदल्यामुळे रस्ता  अरुंद झाला होता . या  रस्त्याचा अंदाज न आलेल्या टेम्पोची  दुचाकीला धडक बसली. दुचाकीला धडक लागल्यानंतर महिला खाली कोसळली.

यामध्ये तिच्या डोक्यावरून टेम्पोचे चाक गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर टेम्पो चालक पसार झाला आहे या अपघाताची नोंद निजामपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.