बोकडाचा बिबट्याने पाडला फडशा

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- राहुरी शहरापासून जवळच असलेल्या देसवंडी येथील गागरे वस्तीजवळ तुळशीदास गागरे यांच्या बोकडाचा बिबट्याने फडशा पाडला.

देसवंडी शिवारातील भागिरथीबाई तनपुरे विद्यालयाच्या मागील बाजूस केशरबाई पतसंस्थेचे व्यवस्थापक तुळशीदास गागरे यांची वस्ती आहे.

त्यांच्या घराजवळील गोठ्यात बांधलेल्या बोकडावर बिबट्याने काल पहाटे ३ वाजेच्या सुमारास हल्ला करून त्याला ठार केले. वन खात्याने या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी देसवंडीचे सरपंच दीपक खेवरे, तसेच तुळशीदास गागरे, अशोक गागरे यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®