‘चीनमधून स्थलांतरित होणाऱ्या उद्योगांना बारामतीत आणावे’

पुणे कोरोनाच्या संकटामुळे जगभरातील आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे उद्योग मोडकळीस आले आहेत. याबाबत चीनला दोष देत अनेक उद्योग चीनमधून बाहेर पडणार असल्याचे चित्र आहे.

देशाने ग्रामीण अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांचे स्वागत करावे. ते उद्योग बारामतीच्या रिकाम्या भूखंडात आणावे, अशी मागणी बारामती इंडस्ट्रीयल असोसिएशन ने केली आहे.

बारामती, जेजुरी, कुरकुंभ येथील औद्योगिक वसाहतीतील प्रमुख उद्योजकांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारा संवाद साधला. यावेळी असोसिएशनच्या वतीने ही मागणी करण्यात आली.

बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संभाजी होळकर, भारत फोर्जचे सुशांतपुस्तके, पियाजियोचे जगदीश गंधे,

जीटीएन ईंजिनीयरींगचे मिश्रा,डायनॅमिक्सचे जितेंद्र जाधव आदीप्रमुख उद्योजक व पदाधिकारी या ऑनलाईन बैठकीमध्ये सहभागी झाले होते.

महाराष्ट्र ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना द्यावी अशी आग्रही मागणी असोसिएशनचे अध्यक्ष जामदार यांनी या बैठकीत केली.

लॉकडाऊनचा उद्योग क्षेत्रावर झालेला परिणाम, परप्रांतीय कामगार यांची मानसिकता व उपलब्धता, कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कंपन्या करत असलेल्या उपाय योजना,

महाराष्ट्र राज्यातील जादा वीजदर, तसेच लघुउद्योगांच्या अर्थकारणावर झालेला विपरीत परिणाम व इतर अनेक अनुषंगिक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली