अहमदनगर कोरोना न्यूज अपडेट्स14 मे 2020, वाचा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या ०७ व्यक्तीच्या अहवालांची प्रतीक्षा असून

आज रात्री पुन्हा १९ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत ६० व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या असून त्यापैकी ४० व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर ०४ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे,

जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत एकूण १७९९ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १६९४ स्त्राव निगेटिव्ह आले तर ६० व्यक्ती बाधित असल्याचे आढळून आले.

आता ४० व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या १३ रुग्ण बूथ हॉस्पिटल मध्ये तर ०३ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com