तिहेरी हत्याकांड! शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

बीड: बीडमधील तिहेरी हत्याकांडाने सारा महाराष्ट्र हादरला आहे.

शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातिल तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आली.

तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना मांगवडगाव इथे घडली आहे.

मांगवडगाव इथे शेतजमिनीचा वाद दोन गटांमध्ये टोकाला गेला.

या वादातून एकाच कुटुंबातील तीन जणांसह एका व्यक्तीवर गावातील काही अज्ञातांनी हल्ला केला.

पूर्ववैमनस्यातून अज्ञातांनी एकाच कुटुंबातील तिघांना संपवलं.

हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपासणी केली.

जखमींला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल तर 3 जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल आहे.