भिंगारमध्ये खून;पोलिसांकडून आरोपी अटकेत

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर शहरातील भिंगारजवळील बाराबाभळी येथे एकाला दारू पाजून खून केल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

रावसाहेब कुंडलिक दारकुंडे (रा. शहापूर, ता. नगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याला दारू पाजून दोघांनी त्याची मान व छाती दाबून हत्या केली आहे.

भिंगार पोलिसांनी 24 तासांत या गुन्ह्याचा उलगडा करून दीपक बापू पाचरणे (वय-30) व खंडू रामभाऊ गाडेकर (वय-47 दोघे रा. शहापूर ता. नगर) या आरोपीना अटक केली आहे.

दारकुंडे याने आम्हाला सोमवारी दुपारी शिवीगाळ केली होते. त्यामुळे आम्ही त्याचा राग धरून त्याला सायंकाळी साडेपाच वाजता दारू पाजवून लाथाबुक्यांनी मारहाण केली.

बाराबाभळी येथील पडीक जमिनीमध्ये एका खोंगळीत दारकुंडे याला ढकलून दिले. मान व छाती दाबून त्याचा आम्ही जीव घेतल्याची कबुली आरोपींनी दिली.

पोलिसांनी दोन्ही आरोपींना या गुन्ह्यात गुरुवारी रात्री अटक केली. ह्या गुन्ह्याचा तपास निरीक्षक प्रवीण पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी,

पंकज शिंदे, भैयासाहेब देशमुख, सहायक फौजदार राजेंद्र गायकवाड, दीपक पाठक, पोलीस नाईक बाबासाहेब गायकवाड, राजू सुद्रीक आदींनी केला.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]