अहमदनगर Live24 टीम,7 ऑगस्ट 2020 :-राहुरी तालुक्यातील देसवंडी येथे धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. याठिकाणी पत्र्याचे शेड बांधण्याच्या कारणावरून दोन गटांत गज, कुर्हाड, लाकडी दांडे व तलवारसारख्या हत्यारांचा वापर करत तुंबळ हाणामारी झाली.
ही घटना काल (गुरुवार) घडली. यात आठजण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी: देसवंडी येथे शिरसाठ यांचे पत्र्याचे शेड बांधण्याचे काम सुरू होते.

यावेळी तेथे कोकाटे गटातील काहीजण आले. शेड बांधण्याच्या कारणावरून शिरसाठ व कोकाटे गटात सुरूवातीला बाचाबाची झाली.
त्यानंतर या दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीत शिरसाठ गटातील प्रकाश भाऊसाहेब शिरसाठ, ज्ञानेश्वर भाऊसाहेब शिरसाठ, दत्तात्रय भाऊसाहेब शिरसाठ, सुरेश भाऊसाहेब शिरसाठ,
अनिकेत दत्तात्रय शिरसाठ, भाऊसाहेब जगन्नाथ शिरसाठ तसेच कोकाटे गटातील निलेश राजेंद्र कोकाटे, दीपक अर्जुन कोकाटे असे एकूण आठजण जखमी झाले आहेत.
यापैकी प्रकाश भाऊसाहेब शिरसाठ, ज्ञानेश्वर भाऊसाहेब शिरसाठ, दत्तात्रय भाऊसाहेब शिरसाठ व सुरेश भाऊसाहेब शिरसाठ हे चारजण गंभीर स्वरूपात जखमी झाल्याने त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













