श्रीरामपूर शहरात कोराेेना टेस्‍ट लॅब उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :-  श्रीरामपूर तालुक्‍यातील नागरीकांच्‍या अतिशय कमीदरात कोवीड टेस्‍ट करता यावी यासाठी माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या सहकार्याने शहरात डॉ.विखे पाटील फौंडेशनच्‍या माध्‍यमातून कोरोना चाचणी नमुना संकलन केंद्राची सुरुवात करण्‍यात आली.

या केंद्राचे औपचारीक उद्घाटन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आले. तालुक्‍यात कोरोना रुग्‍णांची वाढती संख्‍या लक्षात घेवून पद्मश्री डॉ.विखे पाटील फौंडेशनने शहरात कोरोना चाचणी संकलन केंद्र सुरु करावे यासाठी तालुक्‍यातील पदाधिका-यांचे शिष्‍टमंडळ नुकतेच आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांना भेटले होते.

डॉ.विखे पाटील मेमोरीअल हॉस्‍पीटलच्‍या माध्‍यमातून हे केंद्र सुरु करण्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली होती. शहरातील जनसंपर्क कार्यालयात या चाचणी केंद्राचे उद्घाटन पंचायत समितीच्‍या सभापती सौ.संगिता शिंदे यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आले.

याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे पाटील, माजी सभापती दिपक पठारे, माजी सभापती नानासाहेब पवार, जि.प सदस्‍य शरद नवले, प्रकाश चित्‍ते, नगरसेवक मुक्‍तार शहा, केतन खोरे, प्रा‍ताधिकारी अनिल पवार, तहसिलदार प्रशांत पाटील आदि याप्रसंगी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना खासदार डॉ.सुजय विखे पाटील म्‍हणाले की, कोरोनाचे संकट दिवसागणीक वाढत आहे. सर्वच नागरीकांची कोरोना चाचणी करण्‍यासाठी प्रशासनाच्‍या असलेल्‍या मर्यादा आणि पदाधिका-यांनी केलेली मागणी लक्षात घेवून विखे पाटील हॉस्‍पीटलच्‍या माध्‍यमातून हे चाचणी संकलन केंद्र सुरु केले आहे.

अतिशय कमी दरात आणि चाचणीचा लवकर रिपोर्ट मिळावा या उद्देशाने हे केंद्र सुरु करण्‍यात आले असुन, शासनाने ठरवून दिलेल्‍या दरापेक्षा कमी दराने नागरीकांना याठिकाणी चाचणी करुन घेता येईल, जेष्‍ठ नागरीक आणि १० वर्षांच्‍या आतील बालकांसाठी सवलत या केंद्रातून मिळणार असल्‍याचे डॉ.विखे पाटील यांनी सांगितले.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved