अहमदनगर Live24 टीम,1 सप्टेंबर 2020 :- राज्य सरकारने नुकतीच अनलॉक-४ साठी नियमावली जारी केली आहे. यामध्ये मिशिन बिगिन अगेनच्या टप्प्यात काही नियमांत शिथिलता देण्यात आली आहे.
मात्र, राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. विश्व वारकरी सेना आणि वंचित बहुजन आघाडीकडून राज्यातील मंदिरे पुन्हा सुरु करण्यात यावी या मागणीसाठी पंढरपुर येथे आंदोलन केलं होतं.

राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. यामुळे पंढरपूरचे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी ३० सप्टेंबरपर्यंतच बंदच असणार आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे आज जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारनं लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे विठ्ठल मंदिर हे १७ मार्चपासून बंदच आहे.
साडेपाच महिन्यांपासून भाविकांना दर्शन घेता आलं नाही. सोमवारी वंचित व विश्व वारकरी सेनेने केलेल्या आंदोलनानंतर शासनाने येत्या १० दिवसांत मंदिर उघडण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले आहे.
मात्र मंदिर समितीला शासनाकडून काहीच आदेश नसल्याने आता ३० सप्टेंबरपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. देवाचे सर्व नित्योपचार परंपरेप्रमाणे सुरू असून
विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन ऑनलाइन घेण्याची सुविधा भाविकांना उपलब्ध आहे. दरम्यान, वंचितच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व मंदिर,
मशीद, बौद्ध मंदिर, गुरुद्वारा हे लवकरात लवकर भाविकांसाठी सुरु करण्यात येतील. यासाठी नियमावली बनवण्यात येईल, असं अश्वासन दिलं होतं. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं होत.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













