अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे भयानक वास्तव उघडकीस

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे.एकीकडे हे सगळे विदारक परिस्थितीती सुरु असताना जिल्ह्यातील आरोग्य विभागाविषयी अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोनाची लागण होऊ नये यासाठी नागरिक आरोग्याची काळजी घेत आहेत. मात्र कदाचित आपल्याला कोरोनाची लागण झाली तर आपल्या जिल्हा परिषदेकडे एकही कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध नाही आहे. त्यामुळे जिल्ह्यावासियांनो आपला जीव आपणच वाचवा, असेच म्हणण्याची वेळ आली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स न मिळाल्यामुळे एका वृत्त वाहिनीचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचा जीव गेला. त्यानिमित्ताने कुचकामी आरोग्य यंत्रणा आणि आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. जवळपास साडेतीनशे लोकांचा (सरकारी आकडेवारी) जीव कोरोनाने घेतला आहे.

असे असतांनाही जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या आरोग्य विभागाला अद्यापही जाग आलेली नाही. महापालिकेकडे एकूण पाच अ‍ॅम्ब्युलन्स असून त्यातील केवळ एक अ‍ॅम्ब्युलन्स कार्डियाक आहे. अ‍ॅम्ब्युलन्सची संख्या जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या 96 प्राथमिक आरोग्य केंद्राकडे 62 अ‍ॅम्ब्युलन्स आहेत.

त्या अ‍ॅम्ब्युलन्स डिलेव्हरी आणि नॉन कोविड रुग्णांसाठी वापरल्या जातात. तसेच 23 ग्रामीण आरोग्य केंद्रासाठी 23 अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. या शिवाय दोन उपजिल्हा रुग्णालयासाठी दोन अ‍ॅम्ब्युलन्स आहेत. जिल्हा रुग्णालयात 9 कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स जिल्हा रुग्णालयाकडे एकूण 40 अ‍ॅम्ब्युलन्स कार्यरत आहेत. त्यातील 9 अ‍ॅम्ब्युलन्स या कार्डियाक आहेत. तर 31 साध्या अ‍ॅम्ब्युलन्स असल्याची माहिती जिल्हा व्यवस्थापक डॉ. सुवर्णमाला गोखले यांनी दिली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved