खा. विखेंचा ‘त्या’ अधिकाऱ्यांना टोला ; म्हणाले ‘त्यांच्या’ ‘मी’ पणामुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात रुग्णसंख्या खूपच वाढत आहे. जिल्ह्यात जवळपास 40 हजारी पार केली आहे. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला वाणिज्य व विज्ञान

महाविद्यालयाच्या महिला वसतिगृहाच्या प्रशस्त बिल्डिंगमध्ये खासदार डॉ. विखे व माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या संकल्पनेतून 100 बेडचे कोरोना हॉस्पिटल उभारण्यात आले आहे.

याच्या उदघाटन प्रसंगी खा. डॉ. विखे यांनी शासकीय अधिकाऱ्यांवर शरसंधान साधले.ते म्हणाले ‘ कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, म्हणून लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अनेक ठिकाणी लॉकडाऊनची मागणी केली.

मात्र, काही शासकीय अधिकार्‍यांच्या आडमुठेपणाच्या व मीपणाच्या भूमिकेमुळे लोकशाही संपविण्याचा प्रयत्न झाला. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन सामान्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना आखल्या आहेत’.

माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले, करोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये वाढला आहे. अनेक ठिकाणी बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सामान्य जनता आमच्याकडे आशेने बघते.

ही काळाची गरज ओळखून तालुक्यांमध्ये सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कोव्हिड केअर सेंटर सुरू करण्यात यावे, ही संकल्पना मांडत मी खासदार विखे यांच्याबरोबर चर्चा केली व त्यातून हे सुसज्ज असे केअर सेंटर उभे राहिले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved