अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- करोनाची लाट नियंत्रणात आल्याने रोजच्या रुग्ण संख्या मध्ये घट होत आहे. त्यामुळे शहरातील काही कोविड सेंटर बंद केले आहेत. रुग्ण संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी बिनधास्त होवू नये.
येणाऱ्या दोन तीन महिन्यात पुन्हा करोना सक्रीय होण्याची शक्यता शासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व नियमांचे पालन केले तर करोनाची येणारी लाट आपण थोपवू शकू.

नटराज कोविड सेंटर माध्यमातून याठिकाणी चांगले काम झाले आहे. करोनाच्या संकट काळात सर्वसामान्यांसाठी हे सेंटर आधार ठरले आहे. असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी केले.
भाजप, महापालिका व पंडित दीनदयाळ पतसंस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या नटराज कोविड सेंटर मधील रुग्णांना किसान मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य रमेश पिंपळे यांच्या वतीने
नीत्यपोयोगी वस्तू जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा व भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड यांच्या हस्ते देण्यात आल्या.
यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र गंधे, जेष्ठ नेते वसंत लोढा, जिल्हा उपाध्यक्ष श्याम पिंपळे, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव युवराज पोटे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष सुनील पंडित,
नगर तालुका अध्यक्ष मनोज कोकाटे, भाजपा नगर तालुका प्रसिद्धी प्रमुख सागर भोपे, नगर तालुका सरचिटणीस गणेश भालसिंग, संघटनसर चिटणीस बापू बेरड,
किसान मोर्चा नगर तालुका अध्यक्ष महेश लांडगे, नगर तालुका कोषाध्यक्ष गोवर्धन शेवाळे, डॉ. प्रदीप कळमकर आदी उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved













