जिल्ह्यात सुरु असलेल्या या जुगार अड्यावर नाशिक पोलिसांची कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात सध्या अवैध धंदे, वाढते जुगार अड्डे, यांच्यावर सातत्याने कारवाईचे सत्र सुरु आहे. यातच श्रीरामपूर तालुक्यातील एका जुगार अड्यावर नाशिक येथील पथकाने छापा टाकत कारवाई केली.

अवैध गुटख्याच्या साठ्यांवर छापा टाकण्यासाठीच हे पथक शहरात धडकल्याचे मानले जात आहे. श्रीरामपूर पोलिसांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

या पथकाने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी मटका अड्ड्यांवर कारवाई केली. या कार्रवाईअंतर्गत सहा आरोपी मिळून आले. त्यांच्याकडून 11 हजार 780 व सात हजार 110 रुपये रोख मिळून आले.

दीपक ठाकूर व विश्वेश हजारे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. महानिरीक्षक कार्यालयातील विशेष पथकाने पुन्हा गुटखा साठ्यावरील कारवाईच्या हेतूने शहरात मोहीम राबविली.

त्यांना गुटखा मिळून आला नसला तरी पुन्हा कारवाईची शक्यता नाकारता येत नाही. नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा हस्तगत होऊनही सर्रासपणे गुटख्याची दुप्पट दराने छुपी विक्री सुरू आहे.

बेलापूर, एकलहरे, निमगाव, लोणी, निमगाव जाळी हे गुटखा तस्करीचे मोठे केंद्र उघड झाल्याने महानिरीक्षकांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांनी नाशिक परीक्षेत्रातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी एका पथकाची नियुक्ती केली आहे.

दरम्यान दुसऱ्या जिल्ह्यातील पोलिसांनी येऊन आपल्या हद्दीत करवाई केल्याने येथील स्थानिक पोलिसांसाठी ही मोठी चपराक मानली जाते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reservedppp

Leave a Comment