विवाहितेचा छळ करुन केले ‘असे’ काही ; पतीसह सासू-सासर्‍यांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 1 नोव्हेंबर 2020 :- हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करणे, शारीरिक व मानसिक त्रास देणे आदी गोष्टी सातत्याने समाजात होताना दिसतात. प्रशासनाने यावर जरब बसविण्याचा प्रयत्न केला तरीही असे अनेक प्रकार समाजात घडताना दिसतात. अशीच एक घटना सारोळा बद्धी ता. नगर येथे घडली आहे.

सासरच्या मंडळींनी केलेल्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील माहेर असलेल्या विवाहितीने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांनी ज्ञानदेव त्रिंबक जावळे (वय 45) रा. माळीचिंचोरा ता. नेवासा यांनी फिर्याद दाखल केली असून

नेवासा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीत असे म्हटले आहे की, त्यांची मुलगी ज्योती हिचा अमित दिलीप हजारे यांचेशी 2018 मध्ये विवाह झाला होता. लग्नानंतर तू मला आवडत नाही. तुझ्या बापाने हुंडा दिला नाही असे म्हणून मारहाण केली जात होती.

27 ऑक्टोबर रोजी ज्योतीचे सासरे दिलीप हजारे यांचा फोन आला की तीने विहिरीत उडी मारली आहे तुम्ही लवकर या. आम्ही सारोळा बद्धी येथे पोहचलो. ज्योती हिस अमित दिलीप हजारे, सासू मंदाबाई दिलीप हजारे, सासरे दिलीप एकनाथ हजारे यांनी लग्नात

तुझ्या आईबापांनी काहीच सामान दिले नाही व हुंडाही दिला नाही या कारणावरुन पती अमित वेळोवेळी दारु पिवून शिवीगाळ करुन मारहाण करत होता. सासू-सासरे नेहमी घरातील जास्त कामे सांगून माहेरच्या लोकांविषयी वाईट टोमणे मारुन तिचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिस आत्महत्येस प्रवृत्त केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved