पेन्शनरांना पोस्टऑफिसचा दिलासा ; घरपोहच होणार हयातीचा दाखला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 4 नोव्हेंबर 2020 :- दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात प्रत्येक सेवानिवृत्तधारकाला स्वत:च्या हयातीचा दाखला पेन्शन विभागाकडे सादर करावा लागतो. त्यासाठी पेन्शनधारकांची धावपळ सुरु होते. एखाद्या कॅफेवर जाऊन तो दाखला हे पेन्शनधारक तयार करून घेत असतात.

परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यापुढे मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. परंतु याबाबत आता पोस्ट विभागाने पुढाकार घेत शहरासह खेडोपाडी ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

पोस्ट विभागाकडे पेन्शनर मागणी करतील अशा पेन्शनरच्या घरी जाऊन पोस्टमन त्यांचा हयातीचा दाखला आधार कार्ड व बायोमेट्रिक यंत्राच्या सहाय्याने जागेवरच तयार करणार आहे.

त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात किंवा वयोमानानुसार सेवानिवृत्त धारकांना धावपळ करावी लागणार अशी माहिती पोस्ट विभागाचे तक्रार निरिक्षक संदीप हदगल यांनी दिली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment