शाळा सुरु करण्याबाबत मनपा आयुक्त म्हणाले कि…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शाळा – कॉलेज बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाईन क्लास घेण्यात आले होते.

मात्र आता दिवाळीनंतर शाळा उघडणार हि चर्चा सुरु असताना मनपा आयुक्तांनी याबाबत आपले मत व्यक्त केले आहे. शासनाने नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला असला, तरी अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाला घ्यायचा आहे.

नगर शहरातील शाळा सुरू करण्यापूर्वी पालकांची संमती घेण्याची सूचना शाळांना दिली असल्याची माहिती आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शुक्रवारी पत्रकारांना दिली. स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात.

कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिह्यात शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशा सूचना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त मायकलवार म्हणाले, शाळा सुरू करण्यापूर्वी आम्ही सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांची तपासणी सुरू केली आहे.

शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यासह पालकांची परवानगी घेण्याचे आदेश शाळा व्यवस्थापनाला दिले आहेत. त्यामुळे पालकांच्या परवानगीनंतरच शाळा सुरू होतील. दरम्यान, कोरोनाचा फैलाव वाढण्याची भीती असताना स्थानिक प्रशासन कोणता आदेश जारी करेल याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष आहे.

अनेक पालकांना शासनाचा निर्णय आवडलेला नाही. मात्र, घरात बसून कंटाळलेल्या मुलांना आणि त्यांचा सांभाळ करण्यात अडकलेल्या काही पालकांचे लक्ष शाळा कधी सुरू होणार, याकडे लागले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment