महामार्गावर बंदुकीचा धाक दाखवून एकास लुटले

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- नगर – औरंगाबाद रस्त्यावर कांगुणी गावच्या शिवारात सुटके महाराज आश्रमाच्या पुढे दुचाकीवरून रविंद्र राजेंद्र कदम, वय २५ रा. चांदा, ता. नेवासा हा तरुण चांदा गावाकडे जात असताना

प्लॅटिना दुचाकीवर आलेल्या दोघा आरोपींनी कदम या तरुणाच्या दुचाकीला दुचाकी आडवी घालून तू आमच्या मोटारसायकलला कट मारला असे म्हणून शिवीगाळ करुन

खाली पाडून खिशातील १३,५०० रुपये रोख असलेले पाकीट बळजबरीने घेऊन पाकिटातील बँक कार्ड, आधार कार्ड तसेच गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन,

राजमुद्रा शिक्का असलेली पोटाला रिव्हॉल्व्हर लावुन बळजबरीने ओढून लुटून घेतली. लाथाबुक्क्याने मारहाण करून आरोपी दुचाकीवरून नगरच्या दिशेने फरार झाले. सायंकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास ही स्स्तालुट झाली.

रर्विद्र राजेंद्र कदम या तरुणाच्या फिर्यादीवरुन शनिशिंगणापूर पोलिसात अज्ञात दोघा आरोपाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सपोनि बागुल हे पुढील तपास करीत आहेत. नगर – औरंगाबाद रस्त्यावर स्स्तालुटीचे प्रकार वाढले आहेत.