अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढतोय कोरोना ! चोवीस तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-:- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा पायउतार होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णदर घटत असल्याने प्रशासन देखील काही काळ निर्धास्त झाले होते.  मात्र या आनंदावर विरजण पडू लागले असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यात तयार झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढत आहे. तसेच कोरोनाचा धोका वाढू लागल्याने प्रशासन देखील पुन्हा अलर्ट मोडवर आले आहे.

दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातही तब्बल 178 रुग्ण वाढले आहेत याची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे –

  • आजवर झालेल्या कोरोना टेस्ट : 4.01,063
  • एकूण रूग्ण संख्या: 74638
  • बरे झालेली रुग्ण संख्या: 72632
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: 882
  • मृत्यू : 1124

 

राजेश टोपे यांचे रुग्णालयातून जनतेला भावनिक पत्र

सध्या राज्यात कोरोनाने हातपाय पसरण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना काळजीसह खबरदारी घेण्याचे आवाहन केले. तुम्हाला पुन्हा लॉकडाऊन हवा आहे का, असा थेट सवाल केला.

आठ दिवसांनंतर लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाईल, असे संकेत दिले आहेत. त्यानंतर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेयांनी रुग्णालयातून जनतेला पत्र लिहून आवाहन केले आहे. टोपे यांना कोरोनाची बाधा झाल्याने ते सध्या उपचार घेत आहेत.

मात्र, असे असताना वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन त्यांनी रुग्णालयातूनच पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र ट्विट केले आहे. राजेश टोपे यांनी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली आहे. टोपे यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिले असून कळकळीचे आवाहन केले आहे.

गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. सरकारची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना आणि प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्वा न करता लढणारे अनेक कोरोना योध्ये विशेषतः डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलीस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करु शकलो, असे पत्रात राजेश टोपे यांनी कोरोना योध्यांचे कौतुक केले आहे.