अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यास एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात वर्ग करण्यासाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यामुळे दुपारच्या सत्रात पारनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

रेखा जरे यांच्या हत्येनंतर बाळ बोठे फरार असताना त्याच्याविरोधात शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान बोठे याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने बोठेला कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वर्ग करण्याचा निर्णय दिला आहे.
आज दुपारी आरोपी बोठेला ताब्यात घेण्यासाठी कोतवाली पोलिसांचा मोठा फौजफाटा हजर होता.
हैद्राबाद येथून बोठे यास अटक करण्यात आल्यानंतर दि. 14 मार्च रोजी त्यास पारनेर येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते.
त्यावेळी प्रथम वर्ग न्यायाधिश उमा बोर्हाडे यांनी बोठेला सात दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. त्यानंतर अनुक्रमे चार व दोन दिवसांची पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













