अरे देवा : कुठे पोहोचला आहे ‘माझा महाराष्ट्र’ 

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2021:- आता पर्यंत विविध क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमठवणाऱ्या या माझ्या महाराष्ट्राने आता कोरोनाच्या महामारीत देखील नंबर मारला असून, ही अभिमानाची नाही तर धोक्याची घंटा आहे.

जर आपल्याला कोरोनाला हरवायचे असेल तर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना काटेकोरपणे पाळने गरजचे आहे. मागील २४ तासांत देशात ६२ हजार २५८ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

यंदाच्या वर्षात एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. यातील सर्वाधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी ६० टक्के म्हणजे ३९ हजार ९०२ एवढे  रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.

ही आकडेवारी पकडून आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या तब्बल १ कोटी १९ लाख ८ हजार ९१० इतकी झाली आहे. ही देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या गेल्यावर्षीपेक्षा वेगाने वाढत आहे. गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यात पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अवघे ६ ते ८ टक्के होते.

पण यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात हाच पॉझिटिव्हिटी रेट तब्बल ४०  टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. राज्यात काल दिवसभरात ३६,९०२ नवे कोरोना रुग्ण आढळले.

तर एकूण १७,०१९  रुग्ण कोरोनातून बरे झाले. तर काल दिवसभरात कोरोनामुळे एकूण ११२ रुग्णांचा मृत्यू झाला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|