श्रीरामपुरात तालुक्यात कोरोनाचे ९१ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाची व्याप्ती वाढू लागली आहे. प्रशासनाकडून कडक नियमांची अंलबजावणी करण्यात येऊ लागली आहे.

काही ठिकाणी अक्षरश काही दिवसांसाठी लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला मात्र तरीही कोरोना बाधितांची आकडेवारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये.

नुकतेच नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात तेराशेहून अधिक कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यातच श्रीरामपूर तालुक्यात गुरुवारी ९१ रुग्ण सापडले आहेत.

ग्रामीण भागात ३९, तर शहरात ५१ रुग्ण सापडले आहे. तालुक्यात रुग्णांची संख्या सुमारे हजार च्या घरात पोहचली आहे. गुरुवारी ९० रुग्णांची रुग्णांची भर पडली.

यात खासगी प्रयोगशाळा ४४ जिल्हा शल्यचिकित्सक प्रयोगशाळा २० तर अँटीजन चाचणीत २७ रुग्ण सापडले.

कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता तालुक्यातील सर्व खाजगी दवाखाने फुल झालेले आहे. गुरुवारी बेलापूर बुद्रुक,गोंधवणी येथे ७,

उक्कलगाव-४,शिरसगाव-३ नरसाळी मालुंजा, दिघी, मातुलठाण,गोंडेगाव प्रत्येकी १ तर वळदगाव, वडाळा महादेव,दत्तनगर,टाकळीभान येथे प्रत्येकी २, निमगाव खैरी ८ असे ग्रामीण भागात सुमारे ३९ रुग्ण आहेत तर श्रीरामपूर शहरात ५१ रुग्ण सापडले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|