अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- गेल्या वर्षभरात नाटक सुरू करण्यासाठी आम्ही सर्वस्व दिलं. आज सर्व उपाययोजना करून नाटक सुरू आहे. नाट्यक्षेत्राला गती येत असताना असं संकट कोसळू नये. नाटक आज पुर्णपणे सावरलं नाही.
अशात पुन्हा त्याचा घाव बसला तर त्याच्या होणाऱ्या भीषण परिणामांना तोंड द्यावं लागेलं. त्याचा थेट परिणाम आमच्या उपजिवीकेवर होतो.

आता राज्य सरकारने नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेऊ नये ही कळकळीची विनंती आहे, असे म्हणत अभिनेता भरत जाधव यांनी लाॅकडाऊन न करण्याचे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना घातले आहे.
कोरोनामुळे देशातील सर्व क्षेत्राला मोठा फटका बसला होता. सिनेक्षेत्रातलाही मोठ्या प्रमाणात लाॅकडाऊनचा फटका बसला. जानेवारी उजाडला तरी राज्यातील सिनेमागृह आणि नाट्यगृह उघडली नव्हती.
त्यानंतर अभिनेत्यांनी विविध माध्यमातून मागणी केल्यानंतर सरकारने 50 टक्के क्षमतेने सिनेमागृहे चालू केली होती. पण आता पुन्हा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुन्हा नाट्यगृह आणि सिनेमागृह बंद करण्यात येईल अशी चिंता कलाकारांना सतावत आहे.
लाॅकडाऊन काळात सर्वात जास्त फटका उद्योग क्षेत्राला बसला. तर सिनेक्षेत्रातील कलाकार वेबसिरीजकडे वळालेली दिसली. सिनेक्षेत्रावर इतर क्षेत्रातील लोकांचा उदरनिर्वाह देखील अवलंबून असतो.
कलाकारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लाॅकडाऊन करू नका अशी विनंती आधी देखील केली होती. परंतू कोरोना प्रसार वाढत असेल तर लाॅकडाऊन करावाच लागेल.
जर हा निर्णय घ्यावाच लागलाच तर नाट्यक्षेत्राला यातून वगळावं अशी विनंती आम्ही सर्व कलाकार जाऊन मुख्यमंत्र्यांना करणार आहोत, अशी माहिती भरत जाधव यांनी दिली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|













