तीन दिवसात राहुरीत चारशेहून अधिक बाधितांची भर

अहमदनगर Live24 टीम, 23 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाची विक्रमी आकडेवारी दरदिवशी समोर येत आहे. वाढती आकडेवारी प्रशासनासाठी चिंतादायक ठरत आहे.

तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आता कोरोनाचे संक्रमण वेगाने फैलावत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागांमध्ये कोरोनाचा कहर जरा जास्तच पाहायला मिळत आहे. राहुरी तालुक्यात दररोज करोनाबाधितांची संख्या शतकापार झळकत आहे.

गेल्या 72 तासात राहुरी तालुक्यात 420 जणांना करोनाची बाधा झाल्याचे आढळून आले. मात्र, दिवसेंदिवस करोनाबाधितांची संख्या वाढूनही पोलीस, महसूल आणि आरोग्य खाते अद्यापही गाफील असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

सध्या राहुरी तालुक्यात जनता कर्फ्यू सुरू आहे. मात्र, तरीही करोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यात प्रशासकीय यंत्रणेला अपयश आले आहे. तालुक्यासह राहुरी शहरातही सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला आहे.

एकीकडे राज्यात कोरोनाच्या पार्शवभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहे. मात्र नागरिक बेजाबदारपणे वागत आहे, तर अशा बेशिस्तानकडे प्रशासन डोळेझाक करत आहे. त्यामुळे राहुरी शहरात करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|