मंत्र्यांनी बदलीतील पैशातून एखादे कोविड सेंटर उभारावे! ना.बाळासाहेब थोरातांना नाव न घेता खा.विखेंचा टोला

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-राज्यातील मंत्री कोरोनाच्या फक्त आढावा बैठका घेतात या बैठकांमध्ये ऑक्सिजन, रेमडीसिवर इंजेक्शन यांचा आढावा घेतात पण पुढे कार्यवाही शून्य करतात, त्यापेक्षा या मंत्र्यानी बदल्यात कमविलेल्या पैशातून कोविड सेंटर सुरु करावेत.

शासनाच्या पैशातून सुरु केलेल्या कोविड सेंटरवर आपल्या पाट्या लावू नयेत. असा टोला खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लावला.

तालुक्यात लोकसहभागातून सूरु केलेल्या कोविड सेंटरला तर काष्टी येथील ऑक्सिजन प्रकल्पास भेटी वेळी केले.

यावेळी तालुक्यातील लोकसहभागातून सुरू केलेल्या सर्व कोविड सेंटरला औषधासाठी प्रत्येकी ५० हजाराची मदत केली.

यावेळी ते बोलत होते. श्रीगोंदा तालुक्यातील गावगावच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून कोविड सेंटर सुरु केले ही आनंदाची बाब आहे,

इतर तालुक्यात अशी कोविड सेंटर सुरु झाली तर शहरात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांचा लोंढा थांबेल.

यावेळी भाजपकडे एव्हडी रेमडीसिवर इंजेक्शन कोठून आली असे विचारले असता खा. सुजय विखे म्हणाले की रेमडीसिवर इंजेक्शनशी भाजपाचा कोणताही संबंध नाही.

कै. बाळासाहेब विखे यांच्यापासून ५० वर्ष झाले आहेत विखे पाटील घराण्याचे काही उद्योगपतीशी संबध आहेत. आमच्या कॉलेज मध्ये शिकून काहींनी औषध कंपन्या टाकल्या आहेत.

त्यामुळे विमानाने दोन हजार रेमडीसिवर इंजेक्शन आणली आणि रुग्णांना दिली डॉक्टरांनी गरज असेल तरच रेमडीसिवर इंजेक्शन द्यावे विनाकारण रेमडीसिवर इंजेक्शनचा आग्रह धरू नये.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|