खासदार डॉ. विखेंनी एवढा मोठा इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब नाही !

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-  अहमदनगर दक्षिण मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला खरा, पण यावरुन जिल्ह्यात वातावरण तापले आहे.

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. विखे यांनी विना परवाना रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याचा दावा करत याविरोधात हायकोर्टात दाद मागितली आहे. डॉ. विखे यांनी दहा हजार इंजेक्शन विनापरवाना आणले शिर्डी विमानतळावर हा साठा आणण्यात आला.

पण इंजेक्शन कोठून आणले त्याची माहिती दिली नाही काही इंजेक्शन त्यांनी साईबाबा संस्थानच्या रुग्णालय व राहता येथील सरकारी दवाखान्याला वाटप केले.

सदर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त/ शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही एवढा मोठा इंजेक्शनचा साठा कुठेव कसा वापरला याचा हिशोब नाही

सोमवारी(दि.२६) सुनावणी झाली असता, न्या. आर. व्ही. घुगे आणि न्या. बी. यु. देबडवार यांनी पोलीस व जिल्हा प्रशासनाला योग्य ती कायेदशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळे डॉ. विखे यांना कायदेशीर अडचणीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. याविषयीची माहिती ॲड. अजिंक्य काळे यांनी दिली.

सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे व दादासाहेब पवार यांनी ॲड. सतीश तळेकर यांच्यामार्फत फौजदारी याचिका दाखल केली आहे. खा. विखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा तत्काळ शासनाने जप्त करावा व गरजू रुग्णांना जिल्हाधिका-यांमार्फत समन्याय पद्धतीने वाटप करावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

ॲड. प्रज्ञा तळेकर, ॲड. अजिंक्य काळे व ॲड.राजेश मेवारा हे याचिकाकर्त्यांच्या वतीने काम पाहत आहेत तर शासनाच्या वतीने ॲड. डी. आर. काळे यांनी काम पाहिले. याचिकेवर २९ एप्रिल रोजी पुढील सुनावणी होईल.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|