परळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी धनंजय मुंडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे धनंजय मुंडेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धनंजय मुंडे यांनी केज मतदारसंघातील प्रचारसभेदरम्यान पंकजा मुंडे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही सभा दोन दिवसांपूर्वी पार पडली होती. या सभेनंतर याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. यामुळे परळीतील वातावरण चांगलेच तापले होते.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज पंकजा मुंडेंच्या समर्थकांनी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तसेच शेकडो कार्यकर्ते परळी पोलिस ठाण्याकडे रवाना झाले. यावेळी धनंजय मुंडेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. परळी शहर पोलीस ठाण्यात कलम 500, 509, 294 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी महत्त्वाची बातमी ! पुणे रिंग रोड प्रकल्पाच्या बाबत समोर आली मोठी अपडेट
- श्रीरामपुरात पिण्याच्या पाण्याला येतोय जनावर मेल्याचा वास, पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचा संताप
- नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग, गडाख गटासमोर आमदार लंघेची प्रतिष्ठा पणाला
- शनि शिंगणापूर सौरऊर्जेने उजळणार, दिल्लीतील शनि भक्ताने दिले ८० लाख रूपयांचे भव्य दान
- संगमनेरमध्ये सव्वादोन कोटींच्या विकासकामांच्या निधीवरून राजकारण तापले, काँग्रेसचा आमदार खताळांवर जोरदार पलटवार