मोदी-शहांनीही केले राम शिंदेंकडे दुर्लक्ष !

Ahmednagarlive24
Published:

कर्जत :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह या दोघांनीही राम शिंदे यांच्या प्रचाराकडे पाठ फिरवली.

भाजपाच्या एका अंतर्गत सर्व्हेमध्ये राम शिंदे यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याने त्यांची जागा धोक्यात असल्याची बाब पुढे आली होती.

मंत्री असूनही मतदारसंघाचा विकास केला नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी नेमक्या विकासाच्या मुद्द्यावर संपूर्ण निवडणूक आपल्याभोवती केंद्रित केली.

त्यांच्या प्रचाराच्या सांगता सभेला शरद पवार यांनी उपस्थित राहून जोरदार भाषण केले.

यावेळी तरुणांनी त्यांच्या भाषणाला मोठा प्रतिसाद दिला. तर अमित शाह यांच्याही जामखेडमध्ये प्रचार सभेचे आयोजन केले होते. परंतु त्यांनी ऐनवेळी प्रचाराकडे पाठ फिरवली.

शिंदे यांनी मतदारसंघात विकासकामे करायला हवी होती, असंही भाजपच्याच लोकांचं म्हणणं आहे. परंतु त्यांची अकार्यक्षमता आता त्यांना चांगलीच अडचणीत आणण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment