सोनई : गेली चार ते पाच दशके मी या परिसरात व नेवासा तालुक्यात राबलो. या माझ्या तालुक्यात समृद्धी आणायची, एवढी एकच जिद्द मनात होती. माझ्या त्या स्वप्नांना माझ्या पिढीच्या लोकांनी साथ दिली, म्हणून ते स्वप्न प्रत्यक्षात आणू शकलो. आता आयुष्याच्या संध्याकाळी शेवटचा दिस गोड व्हावा, एवढी एकच इच्छा आणि अपेक्षा तुमच्याकडून आहे, असे भावपूर्ण आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले.
क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या सोनई येथील प्रचारसभेत यशवंतराव गडाख बोलत होते. ते म्हणाले, नेवासा तालुक्यात उभ्या केलेल्या अनेक संस्थांच्या माध्यमातून आजवर हजारो कोटींचे चलन घराघरात पोहोचले. त्यामुळे वेगवेगळे उद्योग आणि बाजारपेठ फुलल्या आहेत.

तालुक्याचा प्रपंच सक्षमतेने चालवू शकणाऱ्या आणि तुमच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या शंकररावला निवडून द्या. आपल्या राजकीय जीवनात आपण अनेक कार्यकर्त्यांना मोठे केले. मानाची पदे दिली. काही जण स्वार्थापायी आपली साथ सोडून गेले; पण राजकीय जीवनात आपले ध्येय निश्चित असेल, तर अशा धोकेबाजांच्या सोडून जाण्याचे वाईट वाटून घ्यायचे नसते, असे ते म्हणाले.
प्रशांत गडाख म्हणाले, साहेबांच्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष, अध्यक्ष, सहकारी बँकेचे अध्यक्षपद, खासदार, विधान परिषद आमदार या पदांसाठी संपूर्ण जिल्ह्यातील मतदारांनी त्यांना साथ दिली; पण गडाख साहेबांनी याची परतफेड करीत असताना सगळ्या संस्था व नोकरीच्या संधी या फक्त नेवासा तालुक्यात आणल्या. याची जाणीव सोनई परिसर व नेवासा तालुक्याने ठेवली पाहिजे.
आजवर सोनई परिसराने साहेबांना व शंकररावांना भरभरून साथ दिली. या निवडणुकीत त्यात जास्त मताधिक्याची भर टाकून इथल्या मतदारांनी तालुक्यात आपली मन ताठ ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी महिलांनी सोनई गावातून विशाल प्रचारफेरी काढली.
- शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या राधाकृष्ण विखेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा, खासदार निलेश लंके आक्रमक
- मुंबई-गोवा प्रवास होणार सुपरफास्ट ! महामार्गावरील कशेडी बोगद्याचे ‘या’ तारखेला उदघाट्न , आता 45 मिनिटांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटात
- लाडक्या बहिणींनो 01 मे 2025 रोजी खात्यात जमा होणार एप्रिलचा हप्ता ! ‘या’ 7 लाख महिलांना 1500 नाही तर फक्त 500 रुपये मिळणार
- कॉलेजच्या कॅम्पसमध्ये तरुणींची फिल्मी स्टाईल हाणामारी, कॉलेजच्या विद्यार्थिनींचा जोरदार राडा सोशल मीडियावर झाला व्हायरल, पहा व्हिडीओ
- मोठी बातमी ! केंद्रातील मोदी सरकारचा जातीय जनगणनेचा निर्णय ! शेवटची जातीय जनगणना कधी झाली ? वाचा….