अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता मुलाचा मृतदेह अढळला विहीरीत !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- एक दिवसापासून बेपत्ता आसलेल्या संग्राम संतोष भोसले, वय वर्ष ६ रा फक्राबाद हा बेपत्ता आसलेल्या मुलाचा घराजवळच विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. सदर मुलचा तोल जाऊन पाण्यात पडला आसल्याचा आंदाज वर्तविण्यात येत आहे.

फक्राबाद येथील संग्राम संतोष भोसले वय ६ वर्षे हा मुलगा काल दि ५ फेब्रुवारी रोजी पासुन घरासमोर खेळत आसताना अचानक बेपत्ता झाला होता. या बाबत मुलगा हरवला आसल्याचा मॅसेज व फोटो सोशल मिडीयावर देखील फीरत होता.

या बाबत पोलीस पाटील योगीनाथ जायभाय यांनी सदरची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना दिली होती. काल दिवसभर संग्राम अढळुन आला नसल्याने दुसर्‍या दिवशी सकाळी दि ६ रोजी घराजवळील कठाडे नसलेल्या विहीरीत येथील ग्रामस्थ रज्जाक शेख यांना मुलाच्या चपला विहिरी वरील पाण्यात तरंगताना आढळून आल्या.

या नंतर संग्राम विहीरीत पडला आसल्याचे लक्षात आले. यानंतर सदर विहीरीत दोन मोटारी लावुन पाणी उपसण्यात आले व नंतर दोरी च्या सहाय्याने सदरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. गावाचे चेअरमन यांनी स्वतःचे जनरेटर व ट्रॉक्टर मदतीसाठी दिले होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment