अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-केंद्र सरकारने नवीन तीन कृषी कायदे केले ते चांगले आणि शेतकरी हिताचे कायदे आहेत. त्या कायद्यांना विरोध करणे योग्य नसून या कृषी कायद्यांचे स्वागत केले पाहिजे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले राज्यसभेत म्हणाले.
‘नवीन कृषी कायद्यांना जे म्हणतात काळा, त्यांच्या तोंडाला लावला पाहिजे टाळा’ असे आपल्या खास शैलीत आठवले म्हणाले. तसेच काही लोक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असून, आंदोलन करण्याची काहीच गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मागासवर्गीयांना पदोन्नती मध्ये आरक्षणाचा हक्क मिळण्यासाठी पदोन्नती मध्ये आरक्षणाचा कायदा करावा, अशी मागणी देखील त्यांनी राज्यसभेत केली. रामदास आठवले म्हणाले की, मी जनगणना ही जाती आधारित करावी अशी मागणी आहे.
महाराष्ट्रात मराठा, उत्तर प्रदेशात ठाकूर, हरियाणामध्ये जाट आणि राजस्थानमध्ये रजपूत या क्षत्रिय जाती आरक्षणाची मागणी करीत आहे. त्यामुळे देशभरात क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे १० टक्के आरक्षण देण्यात यावे.असेही ते म्हणाले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved