इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा रास्तारोको आंदोलन

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-गॅस, पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी राहुरी येथे शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश धुडकावून लावणार्‍या शिवसेनेच्या सुमारे 20 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

करोना नियमाचा भंग करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता रास्तारोको आंदोलन केले.

दिवसेंदिवस गॅस, पेट्रोल व डिझेलची दरवाढ होत आहे. ती दरवाढ थांबविण्यात यावी. या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने हे रस्तारोको आंदोलन करण्यात आले होते.

यावेळी हातात झेंडे घेऊन शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली होती.कोरोना नियमनाचे भंग केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यातील हवालदार अशोक महादेव कोळगे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सोमनाथ मच्छिंद्र हारदे, गणेश खेवरे, अमोल खेवरे रा. देसवंडी, कैलास शेळके रा. राहुरी खुर्द, तसेच इतर 10 ते 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe