अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-गेल्या 72 दिवस देशातील शेतकरी दिल्ली सिमारेषेवर अहिंसेच्यामार्गाने आंदोलन करत आहेत. ऊन, वारा, थंडी, पाऊस, कुठलीही पर्वा न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. केंद्र सरकार सदर आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे.
केंद्रशासन व पंतप्रधान यांनी हे तीनही काळे कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. शेतकरी अहिंसेच्या मार्गाने दिल्ली येथे गेल्या 72 दिवसांपासून आंदोलन करत आहेत.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2020/06/97-975260_congress-logo-png-free-background-3-national-parties.png)
त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्यावतीने चक्का जाम आंदोलन केले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक म्हणालेे.
यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे, शहाराध्यक्ष लकी सेठी, महिलाध्यक्षा अर्चना पानसरे, योगेश जाधव, मल्लू शिंदे, सोहेल शेख, नगरसेवक राजेद्र पवार, अल्तमश पटेल, हर्षल दांगट आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या, स्वर्गीय खासदार गोविंदराव आदिक यांनी महाराष्ट्र कृषक समाजाच्यावतीने 11 कलमी शेतकर्यांची सनद तत्कालीन सरकारला दिली होती
त्यातील काही कलमे विचारात घ्यावी, असे सांगत त्यांनी केंद्र सरकारचा जाहीर निषेध केला आणि दिल्ली येथील आंदोलनात शहीद झालेल्या शेतकर्यांना श्रध्दांजली वाहिली
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved